Pune News : सुप्रसिध्द सायबर एक्सपर्ट नचिकेत दांडेकर यांचे टपाल तिकीट
Pune News : हे टपाल तिकीट पुणे सिटी पोस्टच्या मुख्य कार्यालयाच्या सहकार्याने जारी करण्यात आले असून, हे देशभरात वैध असले तरी सामान्य टपाल तिकीटाप्रमाणे पत्र पाठवण्यासाठी वापरता येईल
Updated On:

पुणे: सायबर गुन्हे आणि डिजिटल सुरक्षेच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या पुण्यातील सुप्रसिद्ध सायबर एक्सपर्ट नचिकेत दांडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या ‘माय स्टॅम्प’ (My Stamp) योजने अंतर्गत त्यांचे वैयक्तिक टपाल तिकीट तयार करण्यात आले आहे.
हे टपाल तिकीट पुणे सिटी पोस्टच्या मुख्य कार्यालयाच्या सहकार्याने जारी करण्यात आले असून, हे देशभरात वैध असले तरी सामान्य टपाल तिकीटाप्रमाणे पत्र पाठवण्यासाठी वापरता येईल. आजच्या आधुनिक डिजिटल जगात ईमेल, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर होणाऱ्या फसवणुकीपासून जनतेला सावध करण्यासाठी, तसेच सायबर गुन्ह्यांच्या तपासात पोलीस आणि इतर तपास यंत्रणांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
‘माय स्टॅम्प’ ही भारत सरकारची जुनी योजना आहे, ज्यांत महान व्यक्ती किंवा महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचे फोटो टपाल तिकीटावर छापले जातात. या योजनेतून नचिकेत दांडेकर यांचे टपाल तिकीट तयार करणे हे पुणे सिटी पोस्टसाठी एक आगळे-वेगळे पाऊल ठरले आहे.
विशेष म्हणजे इतर टपाल तिकीटांप्रमाणेच देशात कोठेही हे टपाल तिकीट वापरून पत्र पाठविता येते. या कार्यक्रमास समीर धर्माधिकारी, पुणे सिटी पोस्ट मुख्य कार्यालयाचे पोस्ट मास्टर विलास घुले आणि त्यांचे सहकारी तसेच अॅड. सागर सातपुते उपस्थित होते.
टॅग्स:





