विडणी परिसराला अवकाळीने झोडपले

विडणी – विडणी परिसराला काल (दि. 16) रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. हातातोंडाशी आलेला गहू, ज्वारी, कडवळ, मका या पिकांचे या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
विडणी परिसरात सध्या रब्बी हंगामातील गहू काढणीची लगबग सुरू असून गहू काढणी मशीनची मागणी वाढली आहे. निसर्गाचा लहरीपणामुळे व सततच्या हवामान बदलामुळे शेती व्यवसाय धोक्यात आल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. दरम्यान, विडणी परिसराला काल रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले.
वादळी वाऱ्यामुळे महाड-पंढरपूर महामार्गावर शिवराज ढाब्यासमोर काही वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. या घटनची माहिती मिळताच पोलीस पाटील धनाजी नेरकर यांनी ग्रामसुरक्षा दलासह घटनास्थळी जाऊन जेसीबीच्या साह्याने झाडे बाजूला केली. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली.





