Mainpuri By Election 2022 : अखिलेश व शिवपाल यादव यांच्यातील मनोमिलन टिकाऊ – रामगोपाल यादव

मैनपुरी :– अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यात नव्याने झालेले मनोमिलन हे टिकाऊ आहे. त्यात कोणतेही नाटक नाही असे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी म्हटले आहे. मैनपुरी पोटनिवडणूक गमावण्याच्या भीतीपोटी भाजपने हा “ड्रामा” असल्याचे म्हटले आहे असे नमूद करीत रामगोपाल यादव यांनी म्हटले आहे की, नाट्यशास्त्रात पारंगत असलेल्या लोकांना प्रत्येक बाब नाटकासारखी दिसते.
भूतकाळात मुलायमसिंह यादव यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मैनपुरीच्या जागेवर कमळ फुलणार असल्याचा भाजपचा दावा त्यांनी फेटाळून लावला. ते “मूर्खांच्या नंदनवनात जगत आहेत असेही रामगोपाल यादव यांनी म्हटले आहे.
रामगोपाल यादव यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भाजपचेच लोक नाटक करतात आणि त्यामुळे त्यांना सर्व काही नाटक वाटू लागते. त्यांना सत्य आणि वास्तवही नाटक वाटते.
लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज अन्यथा देशाच्या एकात्मतेला धोका – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह
“चाचा-भतिजा” (शिवपाल-अखिलेश) यांचे नवीनतम पुनर्मिलन काही दिवसांच्या अवधी नंतर झाले. मुलायमसिंह यादव यांची सून डिंम्पल यादव यांच्या फोन मुळे आमच्यातील वाद संपला आणि आम्ही एकत्र आलो असे शिवपाल यादव यांनी म्हटले आहे. अखिलेश व शिवपाल यादव यांच्यात सहा वर्षांपुर्वी फाटाफुट झाली होती. आता त्या काका-पुतण्यांनी चौथ्यांदा हातमिळवणी केली आहे.


