Sonali Kulkarni : “तेव्हा मला जाणवलं की….”; सोनाली कुलकर्णीने सांगितली हृतिक रोशनविषयीची खास गोष्ट
Sonali Kulkarni : सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना सोनालीने मिशन काश्मीर या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनसोबत काम केल्याचा अनुभव शेअर करत एक खास गोष्ट सांगितली.

Sonali Kulkarni : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीसह तिने हिंदी सिनेसृष्टीत देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा चाहतावर्ग मोठा असून तो नेहमी तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतो.
सोनालीने पदार्पणाच्या काळात अनेक दर्जदार भूमिका केल्या असून त्यातून तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना सोनालीने मिशन काश्मीर या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनसोबत काम केल्याचा अनुभव शेअर करत एक खास गोष्ट सांगितली.
‘मिशन काश्मीर’ हा चित्रपट बॅालिवूड चित्रपटात मोठा बदल घडवून आणणारा चित्रपट म्हणून ओळखला जातो. २७ अॅाक्टोबर २००० या दिवशी हा चित्रपट रिलीज झाला होता. याचं दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केलं होतं. संजय दत्त, हृतिक रोशन, प्रिती झिंटा, जॅकी श्रॉफ आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सोनालीने हृतिकच्या आईची भूमिका साकारली होती.
मिशन काश्मीरविषयीची आठवण सांगताना सोनाली म्हणाली” त्याचा (हृतिक रोशन) पहिलाच चित्रपट होता. तो ज्या पद्धतीने भेटला ते मला खूप आवडलं. तो खूप शांत आणि नम्र आहे. छान काम करण्यासाठी तो नेहमी उत्सुक असायचा. माझ्या अॅाडिशेनच्या वेळी देखील तो तिथे होता. आम्हाला एकत्र एकमेकांसोबत सीन करायचा होता तेव्हा आम्ही एकमेकांना अच्छा कराना असं म्हटलं. ” अशी आठवण तिने सांगितली.
पुढे ती म्हणाली, “मी सुद्धा स्ट्रगल करत होते. श्रीनगरमध्ये मिशन काश्मीरचं शुटिंग केलं. तेव्हा मला हृतिकच्या लोकप्रियतेचा अजिबात अंदाज नव्हता. कहो ना प्यार है च्या यशानंतर त्याच्या स्टारडमची जाणीव झाली. एकदा मरीन ड्राइव्हवर पोस्टर दिसलं आणि तेव्हा मला जाणवलं की तो एवढा देखणा आहे. आम्ही एकत्र काम करताना ते मला कधीच जाणवलं नव्हतं”. अशी खास आठवण तिने मुलाखतीत शेअर केली.
हेही वाचा : Sharad Pawar : कर्जमाफीतील अटी रद्द होताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; नातवाचं केलं भरभरून कौतुक म्हणाले…






