Dadar Protest: आंदोलनादरम्यानचा पोलिस कर्मचाऱ्याचा अश्लील वर्तनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; मुंबई पोलिसांनी दिले स्पष्टीकरण
Dadar Protest: चुकीचा अर्थ लावला जात असल्याचं म्हणत पोलीस विभागाने आरोप फेटाळून लावले

Dadar Protest: मुंबईतील दादरमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ अनेक विद्यार्थी जमले होते. यादरम्यान सिव्हिल ड्रेसमध्ये आलेल्या पोलिसाने आक्षेपार्ह पद्धतीने एका तरुणीला पकडले होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकारावर सवाल उपस्थित करत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. (Dadar Protest)
याचदरम्यान आता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची माहिती समोर आली आहे. सदर पोलीस कर्मचारी शिवाजी पार्क पोलीस स्थानकांत कार्यरत असून दीपक बल्लाळ असे त्यांचे नाव आहे. तसेच दीपक बल्लाळ यांच्या संदर्भातील व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात असल्याचं म्हणत पोलीस विभागाने आरोप फेटाळून लावले आहेत.
महोदय, सदर व्हिडिओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे. जेव्हा सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता, तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली. (Dadar Protest)
एक प्रथितयश व्यक्ती म्हणून, तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे… https://t.co/sC76sMbKEW
— मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) July 24, 2026
रोहित पवार काय म्हणाले? (Dadar Protest)
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा प्रकार अत्यंत किळसवाणा असल्याचे सांगत, “हा व्हिडीओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाण कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला.
मुंबई पोलिसांचे प्रत्युत्तर (Dadar Protest)
यावर मुंबई पोलिसांच्या अधिकृत अकाऊंटवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सदर व्हिडिओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे. जेव्हा सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता, तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली. एक प्रथितयश व्यक्ती म्हणून, तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली आहे,” असे मुंबई पोलिसांनी म्हंटले आहे.
हेही वाचा:





