PM Modi Message: “आज पेपरफुटीवर आणखी कडक कारवाई करणार” ; PM मोदींचा मध्यरात्री उशिरा विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेश, VIDEO
PM Modi Message: दिल्लीत जंतर मंतर याठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी काल रात्री उशिरा एक व्हिडिओ संदेश जारी केला.

PM Modi Message: दिल्लीत जंतर मंतर याठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी काल रात्री उशिरा एक व्हिडिओ संदेश जारी केला. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पेपर लीकवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. (PM Modi Message)
पंतप्रधान मोदी यांनी मध्यरात्री जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, “पेपरफुटी हा किरकोळ मुद्दा नाही. या प्रकरणी आज आणखी कठोर आणि कडक कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. (PM Modi Message)
पेपरफुटीविरोधात अधिक कठोर कारवाई करण्यासाठी उद्या मंत्रिमंडळाची चर्चा होईल, असेही त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले? (PM Modi Message)
विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मित्रांनो, पेपरफुटी हा किरकोळ मुद्दा नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रचंड वेदना होतात.” त्यांनी सांगितले की, गेल्या अडीच महिन्यांतील पेपरफुटीच्या घटनांनंतर सरकारने अनेक पावले उचलली असून, दोषींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक वर्ष वाया जाऊ नये, ही सरकारची सर्वात महत्त्वाची जबाबदारी होती. त्यामुळे, अंदाजे २२ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा शक्य तितक्या कमी वेळेत घेण्याची व्यवस्था करण्यात आली.
पंतप्रधानांनी नमूद केले की, १९ तारखेला परीक्षेचे निकालही जाहीर झाले असून, देशभरातून यशस्वी विद्यार्थ्यांच्या आनंदाच्या बातम्या येत आहेत.
More strict actions against paper leaks to come in tomorrow’s Cabinet! pic.twitter.com/NRysBukk5U
— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2026
जलदगती न्यायालये आणि कठोर शिक्षेचा प्रस्ताव (PM Modi Message)
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकार केवळ या एका कारवाईने समाधानी नाही. त्यांनी स्पष्ट केले की, आज त्यांनी संबंधित विभागांना पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी जलदगती न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. विभागांनी अथक परिश्रम करून काल रात्री उशिरा एक मसुदा तयार केला आणि तो त्यांना सादर केला.
पंतप्रधानांनी सांगितले की, या प्रस्तावात जलदगती न्यायालये आणि दोषींना कठोर शिक्षेची तरतूद आहे. या मसुद्यावर शुक्रवारी मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल आणि मंत्र्यांच्या सूचनांनंतर त्याला अंतिम रूप दिले जाईल. त्यांनी सांगितले की, संसदेचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असून, सरकार हे विधेयक सभागृहात लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी प्रयत्न करेल. (PM Modi Message)
दरम्यान, केंद्र सरकारने उच्च शिक्षण विभागाच्या सचिव पदावर मोठा बदल केला आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी विनीत जोशी यांना उच्च शिक्षण विभागाच्या सचिव पदावरून हटवून पंचायत राज मंत्रालयात सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण विभागाच्या नव्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.





