Vasant More : ‘ते’ वक्तव्य भोवलं! वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं होतं?
Vasant More : पुण्याचे माजी नगरसेवक आणि ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना एक वक्तव्य भोवले असून त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vasant More : पुण्यातील माजी नगरसेवक आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते वसंत कृष्णाजी मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये विश्वनाथ तुकाराम लहाडे (वय ७२) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. वसंत मोरे यांच्यावर पत्रकार परिषदेत विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत त्यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
२५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख ते अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही जाणीवपूर्वक व हेतूपूर्वक अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.
तक्रारीत काय म्हटले आहे? (Vasant More )
फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांनी शिवाजीनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत वसंत मोरे यांनी “लहाडे इतका दारू पिला होता की त्याला बोलताही येत नव्हते, ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत आहे” असे अपमानास्पद वक्तव्य केले होते.

Vasant More News
तसेच हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही फिर्यादींनी केला आहे. यामुळे आपली सामाजिक बदनामी झाली असून, कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे, असे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : Anil Ambani : मोठी बातमी! अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ; ईडीकडून मुंबईत 10 ते 12 ठिकाणी छापेमारी





