Hardik Pandya : मैदानावरील ‘ते’ कृत्य भोवलं! हार्दिक पांड्याविरोधात पुण्यातील वकिलाकडून तक्रार दाखल
Hardik Pandya : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मैदानावरील त्या कृत्यामुळे त्याच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर पुण्यातील एका वकिलाने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Hardik Pandya : २०२६ च्या टी २० विश्वचषकावर भारतीय संघाने नाव कोरलं. न्यझीलंडला अंतिम सामन्यात पराभवाची धूळ चारल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदानावर जंगी सेलिब्रेशन केले.
मात्र, टीम इंडियातील एका अष्टपैलू खेळाडूने आनंद साजरा करताना मैदानावरच केलेल्या एका कृत्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. यानंतर आता थेट पुण्यातील एका वकिलाने त्याच्याविरोधात एफआर दाखल केला आहे. Hardik Pandya
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आहे. गर्लफेंड महिकासोबत मैदानातील बक्षीस वितरणासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजवर हार्दिक पांड्या झोपला होता. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर झाला.
त्यानंतर दोघांवर संताप व्यक्त करत हार्दिकच्या वर्तनावर टीका करण्यात आली. सदर प्रकरण त्याला भोवले असून पुण्यातील वकील वाजिद खान यांनी त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
टी २० विश्वचषक भारतीने जिंकल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. टीम इंडियातील खेळाडूंचा आनंद गगणात मावेनासा झाला. त्यांनी मैदानावर जंगी सेलिब्रेशन केले.
दुसरीकडे हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफेंड महिका शर्मा मैदानावर फिरत होते, नाचत होते. महिकाने यावेळी हार्दिक पांड्याला अनेकदा मिठी मारली. त्याच्या गालावर किसही केले.
त्यानंतर दोघांचे व्हिडिओ सोश मीडियावर व्हायरल झाले. त्यांनी केलेल्या वर्तनावर नेटकऱ्यांनी कडाकडून टीका केली. हार्दिकने मैदानावर केलेले कृत्य अनेकांना खटकलं. चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर हार्दिकला ट्रोल केले.
वकिलाचा दावा (Hardik Pandya)
हार्दिक पांड्याने भारतीय ध्वजात गुंडाळून महिका शर्मासोबत सेलिब्रेशन केले. हे करताना त्याने नाच केला. नंतर तो झोपला, ज्यामुळे भारतीय ध्वजाचा अपमान झाला, असा दावा वकील वाजिद खान यांनी केला आहे.
हेही वाचा : Archana Patil : काशेवाडीत ड्रग्ज व वेश्याव्यवसायाचा उच्छाद; नगरसेविका अर्चना पाटील आक्रमक






