Utarakhand : “मदत करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही”; PM मोदींचा मुख्यमंत्री धामी यांना फोन
tharali village | Utarakhand : उत्तरकाशीतील धराली येथे झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे की, ‘मी मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली मदत आणि बचाव पथके शक्य तितके प्रयत्न करत आहेत. यासोबतच त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले’ आहे.
उत्तरकाशी के धराली में हुई इस त्रासदी से प्रभावित लोगों के प्रति मैं अपनी संवेदना व्यक्त करता हूं। इसके साथ ही सभी पीड़ितों की कुशलता की कामना करता हूं। मुख्यमंत्री पुष्कर धामी जी से बात कर मैंने हालात की जानकारी ली है। राज्य सरकार की निगरानी में राहत और बचाव की टीमें हरसंभव…
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2025
पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘उत्तरकाशीतील धाराली येथील या दुर्घटनेत बाधित झालेल्या लोकांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. यासोबतच, मी मुख्यमंत्री पुष्कर धामीजी यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली मदत आणि बचाव पथके शक्य तितकी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लोकांना मदत करण्यात कोणतीही कसर सोडली जात नाही’. असं पंतप्रधान म्हणाले आहे.
धराली गाव हे गंगोत्री धाम आणि गंगा नदीच्या उगमाच्या अगदी जवळ आहे. या भागात ढगफुटीमुळे लोक भयभीत झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना लागलीच सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. अजून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. कोणत्याही प्रकारची मोठी घटना होऊ नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहाकडे जाऊ नये असे आवाहन प्रसासनाकडून करण्यात आले आहेत.





