तान्हाजीला दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे मनापासून आभार – अजय

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू शूरवीर सहकारी सेनापती तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत “तान्हाजी : द अनसंग वॉरियर” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तान्हाजी चित्रपट छत्रपती शिवरायांचा वीर योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे.
हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १५.१० कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २० कोटींची बाजी मारली आहे. दोन दिवसांत चित्रपटाने ३५ कोटींच्या जवळपास कलेक्शन केले आहे.
Sincere thanks ?#TanhajiUnitesIndia #TanhajiTheUnsungWarrior pic.twitter.com/LItIb9BR4M
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 11, 2020
दरम्यान, चित्रपटाच्या रिलीजनंतर अभिनेता अजय देवगनचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये अजय म्हणतो की… नमस्कार, मी अजय देवगन… जे प्रेम तुम्ही लोकांनी तान्हाजीला दिले आहे… त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो… भारतीयांनी आणि भारताबाहेर राहणाऱ्यांना सांगू इच्छितो की… त्यांनी तान्हाजी मालसुरे यांनी केलेला त्याग पाहावा आणि जगाला सांगावे. सर्वांचे धन्यवाद… असं अजय म्हणाले.





