Thama Movie | रश्मिका मंदानाचा दमदार लुक; ‘थामा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
Thama Movie | अभिनेत्री रश्मिका मंदानाने अल्पावधीत सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. चाहते देखील तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. लवकरच ती ‘थामा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा नवा लुक तिने शेअर केला आहे.
हिरव्या रंगाचा ड्रेस, नाकात नथ आणि तीक्ष्ण नजर अशी ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रश्मिकाच्या इन्स्टा पोस्टमध्ये तिचा स्टायलिश अंदाज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा हा दमदार या लुक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. Thama Movie |
View this post on Instagram
या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील समोर आला आहे. मॅडॉक फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवरून ‘थामा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘थामा’ हा दिनेश विजनच्या मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील पहिली प्रेमकथा आहे. टीझरच्या सुरुवातीला आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना जंगलात दिसतात. Thama Movie |
त्यानंतर, रश्मिका-आयुष्मान यांच्या प्रेमकथेतही काही अडचणी येतात, ज्यात भयपटाचाही समावेश आहे. जंगलात प्राण्यांसोबत आयुष्मान दोन हात करतो. ही फिल्म प्रेमकथा आहे, पण त्यात प्रेमाबरोबरच रक्तरंजित खेळही आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे.
हेही वाचा :





