Jana Nayagan : थलपती विजयच्या Jana Nayagan ची कमाल! साऊथमध्ये ठरला हिट; भारतातही मॅजिक फिगर गाठण्याच्या तयारीत
Jana Nayagan : मात्र तिसऱ्या दिवशीच्या झालेल्या कमाईने ती घसरण भरून काढली आहे.

‘Jana Nayakan’s’ third-day box office collection : मोठ्या अडथळ्यांचा सामना केल्यानंतर अखेर थलपती विजय यांचा बहुप्रतिक्षेत ‘जन नायकन’ हा चित्रपट २३ जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे.
या चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी बॅाक्स अॅाफिसवर घवघवीत यश मिळवले असून, मोठी कमाई केली आहे. थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटात थोडी घसरण झाली. मात्र तिसऱ्या दिवशीच्या झालेल्या कमाईने ती घसरण भरून काढली आहे.
Sacknik रिपोर्टनुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी भारतात २८.५० कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवसाच्या २१.१५ कोटी रुपयांच्या कमाईपेक्षा हे जवळपास ३४.८ टक्के अधिक आहे. तीन दिवसांत हा चित्रपट भारतात १०० कोटींच्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे . ॲक्शन, स्टार पॉवर आणि विजयच्या फॅन फॉलोइंगचा प्रभाव चित्रपटाच्या कमाईवर स्पष्टपणे दिसत आहे.
साऊथमध्ये या चित्रपटाचे तिकीट मिळणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणचे शोज हाऊसफुल्ल झाले आहेत. तरुणवर्ग चित्रपटगृहात जल्लोष करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दिग्दर्शक एच. विनोद यांनी जन नायकन चित्रपटाचे दिग्दर्शक केले आहे. संगीत अनिरुद्ध यांनी दिले आहे. अभिनेत्री पूजा हेगडेच्या अभिनयाची प्रशंसा होत असून, खलनायकाच्या भूमिकेतील बॅाबी देओल भाव खाऊन गेला आहे. चित्रपटात प्रकाश राज यांच्यासह अनेक कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.
शनिवारच्या कमाईनंतर ‘जन नायकन’ने भारतात तीन दिवसांत ९२.३५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. त्याचबरोबर भारतातील चित्रपटाचे एकूण कलेक्शन १०८.३४ कोटींवर पोहोचले आहे. परदेशातही या चित्रपटाची चांगली कामगिरी होत आहे. तिसऱ्या दिवशी, चित्रपटाने परदेशातून सुमारे २० कोटी रुपये कमावले आहे. त्यामुळे सध्या बॅाक्स अॅाफिसवर विजयराज पाहायला मिळत आहे.
धमाल ४ चे घवघवीत यश
जन नायकनने अनेक चित्रपटांना जोरदार टक्कर दिली आहे. असे असले तरी धमाल ४ ला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. ‘धमाल ४’ ने तिसऱ्या आठवड्यात दमदार पदार्पण केले असून ४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन १४३.४० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
दरम्यान, भारतातील चित्रपटाचे एकूण कलेक्शन १७० कोटींवर पोहोचले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटातील मजेशीर पात्र, हलकीफुलकी कथा आणि अचूक कॉमेडी टायमिंग प्रेक्षकांना प्रभावित करत आहे.
Malaika Arora: “कोण आहे हे लोक?” मलायका अरोरा भोजपुरी सुपरस्टारवर संतापली





