Box Office Collection : राजा शिवाजी, देऊळ बंद 2 नंतर आता ‘तुंबाडची मुंजळा’ची हवा! तीनच दिवसांत केली मोठी कमाई
Box Office Collection : 5 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात दमदार कमाई करत लक्ष वेधून घेतले आहे.

Box Office Collection : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या हॉरर-कॉमेडीचा ट्रेंड जोरात असून ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटांन यश मिळाल्यानंतर आता ‘तुंबाडची मंजुळा’ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. 5 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात दमदार कमाई करत लक्ष वेधून घेतले आहे. (Box Office Collection)
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने 60 लाख रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढल्याने कमाईचा आकडा 1.10 कोटी रुपयांवर पोहोचला. त्यानंतर रविवारी चित्रपटाने तब्बल 1.93 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली. विकेंडनंतरही चित्रपटाची घोडदौड कायम असल्याचे दिसून आले. (Box Office Collection )
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंडनुसार, सोमवारी चित्रपटाचे सुमारे 600 शो पार पडले. विकेंडच्या तुलनेत कमाईत थोडी घट झाली असली तरी चौथ्या दिवशी चित्रपटाने 84 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाने मोठी कमाई केली आहे.
हेही वाचा : Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! तीन महिने ‘हा’ पूल बंद राहणार; वाहतुकीचा मोठा खोळंबा
या चित्रपटाला चौथ्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत चित्रपटाने एकूण 3.97 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट आगामी दिवसांत कमाईचा आणखी मोठा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ( Box Office Collection )
हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटात सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे आणि अथर्व रुके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विविध कारेगावकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, चित्रपटाची कथा, त्यातील विनोद आणि याचा वापर करून दाखवण्यात आलेला थरार प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे. (Box Office Collection )
हेही वाचा : Rohit Pawar: “मतांसाठी फसवणूक करणारं विश्वासघातकी सरकार”; रोहित पवारांचा हल्लाबोल





