Malaika Arora: “कोण आहे हे लोक?” मलायका अरोरा भोजपुरी सुपरस्टारवर संतापली
Malaika Arora:

Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. मात्र सध्या ती एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ती भोजपुरी सुपरस्टार खेसारीलाल यादवच्या एका व्हिडिओवर संताप व्यक्त करताना दिसली.
व्हायरल व्हिडिओमध्ये खेसारी लाल यादव एका कार्यक्रमात रेड कार्पेटवर फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. याच दरम्यान रेड कार्पेटवर एक कुत्रा येऊन बसतो. खेसारी यांनी सांगितल्यानंतर एका व्यक्तीने त्या कुत्र्याला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
पण जेव्हा तो कुत्रा जागेवरून हलत नव्हता, तेव्हा एक माणूस त्याला पायाने ढकलत होता, तर त्याचवेळी तेथील एका महिलेने कुत्र्याला ओढून खेसारींपासून दूर नेले. हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर टीका करायला सुरुवात केली.
View this post on Instagram
हा व्हिडिओ पाहताच मलायका अरोरानेही संताप व्यक्त केला. तिने खेसारीचा तोच व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पुन्हा शेअर केला आणि आपला राग व्यक्त केला. तिने विचारले, “हे लोक कोण आहेत? आणि हा उभा राहून पोज देणारा माणूस कोण आहे?,”‘ असे म्हंटले आहे. मलायका अरोराची खेसारीबद्दलची पोस्ट आता व्हायरल होत आहे. Malaika Arora
मात्र मलायकाच्या या कमेंटनंतर खेसारी लाल यादव यांचे चाहते आता तिला ट्रोल करत आहेत. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील इतर पोस्टवर जाऊन चाहते कमेंट्स करत आहेत आणि खेसारी लाल यांना न ओळखल्याबद्दल मलायकावर राग व्यक्त करत आहेत.
दरम्यान, मलायका श्वानप्रेमी आहे आणि ती नेहमीच त्यांना पाठिंबा देत असते. मलायका अनेकदा तिच्या कुत्र्यांसोबत दिसते आणि त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. Malaika Arora
हेही वाचा:





