Thailand-Cambodia conflict । थायलंड आणि कंबोडियामधील संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही देशांचे नेते मलेशियात भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. थायलंडच्या पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. सीमेवर गेल्या पाच दिवसांपासून थायलंड आणि कंबोडियाच्या सैनिकांमध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत ३४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत आणि १.६८ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. चर्चा कधी होणार? Thailand-Cambodia conflict । थायलंडच्या पंतप्रधान कार्यालयाचे प्रवक्ते जिरायू हुआंगसाप यांनी या विषयी माहिती देताना, “मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणावरून सोमवारी होणाऱ्या चर्चेत कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई सहभागी होणार आहेत,” असे त्यांनी यावेळी सांगितले. जिरायू पुढे म्हणाले की, “फुमथमचे कंबोडियन समकक्ष हुन मानेट देखील चर्चेत सहभागी होतील, जरी कंबोडियन अधिकाऱ्यांनी त्याची त्वरित पुष्टी केलेली नाही.” अशा प्रकारे संघर्ष झाला सुरू गेल्या आठवड्यात थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवरील बोगद्यात झालेल्या स्फोटात पाच थाई सैनिक जखमी झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष सुरू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांनी थायलंड आणि कंबोडियाच्या नेत्यांशी बोलणे केले आहे आणि जर संघर्ष सुरूच राहिला तर ते दोन्ही देशांसोबत व्यापार करार पुढे नेणार नाहीत असे सुचवले आहे.” नंतर त्यांनी सांगितले की “दोन्ही बाजूंनी युद्धबंदीवर वाटाघाटी करण्यास सहमती दर्शविली आहे.” कंबोडियाच्या पंतप्रधानांनी काय म्हटले? Thailand-Cambodia conflict । कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी,” त्यांच्या देशाने “तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदी” वर सहमती दर्शविली आहे.” असे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की,”ट्रम्प यांनी त्यांना सांगितले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या फुमथम यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर थायलंडनेही हल्ले थांबवण्यास सहमती दर्शविली आहे.” राजनैतिक प्रयत्नांना न जुमानता, दोन्ही देशांच्या वादग्रस्त सीमेच्या काही भागात रविवारी संघर्ष सुरूच राहिला. सध्या दोन्ही बाजूंमध्ये लष्करी कारवाया सुरू आहेत आणि आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत.