Breaking News : मोठी बातमी.! ‘या’ दोन खासदारांना थेट केंद्रात मंत्रिपद मिळणार
सहा फुटीर खासदारांपैकी चार खासदार दिल्लीहून मुंबईत दाखल झाले असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

Breaking News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील बंडखोर खासदारांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सहा फुटीर खासदारांपैकी चार खासदार दिल्लीहून मुंबईत दाखल झाले असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर मात्र मुंबईऐवजी दिल्लीकडे रवाना झाल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. आता यातीला संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर या दोन खासदारांना केंद्रात दीड-दीड वर्ष मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघांना दीड-दीड वर्षे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समोर आले आहे.
मुंबईत दाखल झाले हे खासदार
दिल्लीहून मुंबईत आलेल्या खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे तर खासदार संजय दिना पाटील हे आधीपासून मुंबईत असून तेही शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी पोहोचल्याचे समजते.
विकासासाठी सत्तेत जाण्याचा दावा
रविवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ओमराजे निंबाळकर यांनी विकासकामांसाठी आणि निधी मिळवण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे नागेश पाटील आष्टीकर यांनीही मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
आज होणार औपचारिक प्रवेश?
ओमराजे दिल्लीतील प्रक्रिया पूर्ण करून मुंबईत पोहोचल्यानंतर सहा बंडखोर खासदारांचा एकत्रितपणे शिंदे यांच्या शिवसेनेत औपचारिक प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना आज निर्णायक वळण मिळण्याची चिन्हे आहेत.
हे देखील वाचा :
Omraje Nimbalkar : बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर





