TET Paper Leak Case : टीईटीप्रकरणी आग्र्यातून आणखी तीन आरोपींना अटक; ‘मकोका’ लावण्याची तयारी!
TET Paper Leak Case : शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात ठाणे आणि भिवंडी पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक अत्यंत मोठे यश आले आहे.

TET Paper Leak Case : टीईटी पेपरफुटीप्रकरणी आग्रा येथून आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. नरेशकुमार माहोर, संजयकुमार शर्मा , बाबूलाल कुशवाहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आतापर्यंत टीईटीफुटी प्रकरणांमध्ये दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. (TET Paper Leak Case)
महिम पत्रण प्रा. लि. प्रिंटिंग प्रेस आग्रा येथून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तीन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या तिन्ही आरोपींना 9 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (TET Paper Leak Case)
या प्रकरणाचे धागेदोरे बिहार, हरियाणा, दिल्ली, आग्रा तसेच इतर राज्यांपर्यंत पोहोचत असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या चेकची पडताळणी, आर्थिक व्यवहार, इतर साथीदार आणि संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा तपास सुरू आहे. (TET Paper Leak Case)
प्रकरणाच्या गांभीर्यामुळे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून राज्यभरातील नेटवर्कचा शोध घेतला जात आहे. हे रॅकेट अत्यंत संघटित पद्धतीने चालवले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. (TET Paper Leak Case)
त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर अत्यंत कडक कारवाई करण्यासाठी आणि रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी मकोका लावण्याच्या संदर्भात सध्या कायदेशीर तपासणी आणि पडताळणी सुरू आहे. (TET Paper Leak Case)





