Peth News : चांदोली धरण क्षेत्रात संततधार
Peth News : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने चिंतेत असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याला जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने मोठा दिलासा दिला आहे.

Peth News : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात गेल्या दोन तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असून शनिवारी २५ मिलिमीटर व एकूण ३७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Peth News)
तसेच वारणा धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज याठिकाणी या हंगामात ८३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणातील पाणीसाठा १२.८८ टीएमसी झाला आहे. (Peth News)
धनगरवाडा, खुंदलापूर, सोनवडे, आरळा, गुढे पाचगणी, पणुंब्रे, वारूण, चरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली असून वारणा नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. भाताची पेरणी केलेल्या शेतातून मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून ओढे भरून वाहू लागले आहेत. (Peth News)
संपूर्ण जून महिना कोरडा गेला असून दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली होती. परंतु, जुलैमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी आनंदात आहे. (Peth News)





