Mahabaleshwar News : अतिवृष्टीने नावली येथे डोंगराचा काही भाग खचला; तीन घरांमधील नागरिकांचे स्थलांतर
Mahabaleshwar News : महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर खचण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

Mahabaleshwar News : महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका नावली गावाला बसला आहे. गावाच्या वरच्या बाजूचा डोंगराचा काही भाग शनिवारी सकाळी अचानक खचून, झाडांसह मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर कोसळली. (Mahabaleshwar News)
या घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेत, बचावकार्य आणि माती हटवण्याचे काम हाती घेतले आहे. गावातील तीन घरांमधील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून, गाव सुरक्षित असल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला आहे. (Mahabaleshwar News)
घटनेच्या ठिकाणाजवळ गावाची पाण्याची टाकी असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून टाकीची तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी पाहणी केली असून, ते पुढील उपाययोजना निश्चित करत आहेत. (Mahabaleshwar News)
प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनीही घटनास्थळी भेट देऊन, परिस्थितीचा आढावा घेत, संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. डोंगर खचलेल्या भागालगत चार घरे असून, त्यापैकी एक घर बंद आहे. उर्वरित तीन घरांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. (Mahabaleshwar News)
Rain Updates : कोकणासह मुंबईला हायअलर्ट; ७ जुलैपर्यंत वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा
या परिसरावर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवत असून, खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नावली गावाला सध्या कोणताही धोका नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नयेत. (Mahabaleshwar News)
प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून आहे, असे तहसीलदार सचिन मस्के यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास संबंधित यंत्रणांना तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे. (Mahabaleshwar News)






