जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला
Updated On:

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील कालाई येथे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर ग्रेनेड फेकले.
“रात्रीच्या सुमारास कालाई येथील पूलावर पोलिसांच्या वाहनाच्या दिशेने ग्रेनेड फेकण्यात आले. या ग्रेनेडचा स्फोट झाला नाही. त्यामुळे जिवीतहानी झाली नाही” असे पूँछ जिल्ह्याचे एसएसपी रमेश कुमार यांनी सांगितले.
या ग्रेनेड हल्ल्यानंतर या भागात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे असे रमेश कुमार यांनी सांगितले. राजौरी आणि पूँछ या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये दहशतवाद भडकवण्याचा पाकिस्तान आणि त्यांच्या स्लीपर सेलचा प्रयत्न असतो.
या दोन जिल्ह्यात शस्त्र आणि ड्रग्ज पुरवठा करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो असे यंत्रणेकडून सांगण्यात आले. असे प्रयत्न उधळून लावण्यास आम्ही सक्षम आहोत, असे सुरक्षा दलांकडून सांगण्यात आले.




