दहशतवादी गो बॅक; प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

नवी दिल्ली – मध्यप्रदेशमधील भोपाळच्या माखलाल चतुर्वेदी विश्वविद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले होते. या विद्यार्थ्यांना खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर भेटण्यासाठी आल्या. यावेळी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध करत प्रज्ञा ठाकूर गो बॅक, दहशतवादी गो बॅक अशा घोषणा दिल्या.
#WATCH Bhopal: NSUI workers raise “aatankwadi wapas jayo” & “Pragya Thakur, go back” slogans at Makhanlal Chaturvedi University. BJP MP Pragya Thakur had gone there to meet female students who were sitting on a ‘dharna’ against the university, over attendance issue. (25.12.19) pic.twitter.com/HKU1tZqoBY
— ANI (@ANI) December 25, 2019
प्रज्ञा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यानंतर एमसीयु रेक्टर श्रीकांस सिंग आणि कुलगुरु दीपक तिवारी यांच्याशीही चर्चा केली. रेक्टर आणि कुलगुरुंशी चर्चा करत असताना एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी एनएसयुआयने केलेल्या वादग्रस्त घोषणाबाजीविरुद्ध कारवाई केली जाईल असं प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या. एका खासदाराला कार्यकर्त्यांनी दहशतवादी म्हटलं आहे. त्यांनी एका महिला खासदाराला, संवैधानिक पद असलेल्या व्यक्तीचा अपमान केला असल्याचेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, दोन विद्यार्थिनी मनु शर्मा आणि श्रेया पांडे यांच्याविरोधात विद्यापीठाने निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर विद्यार्थिनी धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. क्लासमध्ये कमी उपस्थिती असल्याचे सांगून त्यांना तिसऱ्या सेमिस्टरसाठी बसता येणार नाही असे सांगण्यात आले होते. मात्र विद्यार्थिनींनी पोलिसांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यास सुरवात केली. अखेर एमसीयू प्रशासनाने विद्यार्थिनींच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.





