Terrorist Attack : अमरनाथ यात्रा सुरु होण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी पर्यटकांना केले लक्ष्य; हल्ल्यात १२ जण गंभीर जखमी

Jammu Kashmir | Terrorist Attack : मंगळवारी (दि. २२) जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम शहरातील एका पर्यटन रिसॉर्टवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात किमान १२ पर्यटक जखमी झाले. पहलगामच्या बैसरन खोऱ्यातील वरच्या भागात हा गोळीबार झाला.
सुरक्षा दलांकडून परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये असे काही भाग आहेत जिथे दहशतवाद दिसत नाही, पहलगाम देखील त्यापैकी एक आहे. यावेळी दहशतवाद्यांनी यालाही लक्ष्य केले आहे.
पोलिसांनी सांगितले की, या गोळीबारात १२ जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाचे पथक अजूनही परिस्थितीचा आढावा घेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पर्यटक राजस्थानहून आल्याचे उघड झाले आहे.
हे एक पर्यटन क्षेत्र आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत, त्यामुळे लोक हळूहळू या भागात भेट देण्यासाठी येत आहेत. या हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे म्हटले जात आहे.
सरकारी सूत्रांनुसार, अलिकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी हिंदूंविरुद्ध एक भडकाऊ विधान केले होते. यानंतर लगेचच दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. असीम मनीर हा लष्कर, जैश आणि हिजबुल सारख्या दहशतवादी गटांना जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ले करण्यासाठी प्रवृत्त करत होता हे अगदी स्पष्ट होते.
यासोबतच अमरनाथ यात्रा देखील काही दिवसांत सुरू होणार आहे. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम देश सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी डीजीपी एसपी वैद काय म्हणाले?
या हल्ल्याबद्दल बोलताना माजी डीजीपी म्हणाले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ला ही चिंताजनक बातमी आहे कारण अमरनाथ यात्रा काही दिवसांत सुरू होणार आहे आणि तिचा बेस कॅम्प पहलगाममध्येच आहे. शिवाय, पर्यटकही मोठ्या संख्येने येत आहेत. बहुतेक दहशतवादी पर्यटकांवर हल्ला करत नाहीत, याचा परिणाम स्थानिक रहिवाशांच्या व्यवसायावरही होतो.





