चंदेरीत पुन्हा पसरली दहशत.! राजकुमार राव, श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री 2’चा खतरनाक टिझर आउट

मुंबई – अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री’ने थिएटरमध्ये प्रेक्षकांची खूप मने जिंकली आहे. 2018 मध्ये आलेल्या या चित्रपटाला इतके प्रेम मिळाले की, ‘स्त्री’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतत आहे. ‘स्त्री 2’चे शूटिंग सुरू झाले असून, नुकतीच जिओ स्टुडिओ आणि मॅडॉक फिल्मने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
‘स्त्री 2’ चित्रपटात अभिनेता राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर सारखे प्रसिद्ध कलाकार काम करताना दिसणार आहेत. मात्र, ‘स्त्री’चा सिक्वेल यावेळी वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात येणार आहे. जिथे ‘स्त्री’च्या पहिल्या भागात ‘ओ स्त्री कल आना..’ सारखे डायलॉग खूप चर्चेत होते. त्यामुळे यावेळी ‘ओ स्त्री रक्षा करणा…’ सारख्या डायलॉगसह टिझर प्रदर्शित केला आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत ‘स्त्री 2′ चित्रपटाविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे. श्रद्धा कपूरने लिहिले: चंदेरीमध्ये पुन्हा एकदा दहशत पसरली..! ती ऑगस्ट 2024 ला येत आहे.’ असं कॅप्शन देखील अभिनेत्रीने या व्हिडिओला दिलं आहे.
श्रद्धा कपूरनेही या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. पण ‘स्त्री’चा सिक्वेल अगदी वेगळ्या पद्धतीने रिलीज होणार आहे. ‘स्त्री 2’ चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही, परंतु व्हिडिओसह दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट ऑगस्ट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





