Pune Accident News :कात्रज घाटात भीषण अपघात! सळ्यांनी भरलेल्या ट्रकची बसला धडक; चालकाचा मृत्यू
Pune Accident News : अपघातात चार ते पाच जण जखमी झाले असून, या अपघातात ट्रकचा क्लीनर हा अद्याप लोखंडी सळ्या व ट्रकचा केबिन यामध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.

Pune Accident News : कात्रज नवीन बोगदाकडून नवले ब्रिजकडे येताना दरी पुलाजवळ जांभुळवाडी या ठिकाणी लोखंडी पाईप भरलेल्या ट्रकने बसला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे.
या अपघातात बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ट्रक चालकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपघातात चार ते पाच जण जखमी झाले असून, या अपघातात ट्रकचा क्लीनर हा अद्याप लोखंडी सळ्या व ट्रकचा केबिन यामध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पेट्रोलिंग पथक देखील दाखल झाले होते. भल्या पहाटे झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
पहाटेच्या वेळीही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.




