Water Cut Pune : गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद; ‘या’ भागांवर होणार मोठा परिणाम
Water Cut Pune : शहरातील जलशुद्धीकरण केंद्रे आणि पंपिंग स्टेशनमध्ये तातडीच्या दुरुस्तीचे काम; गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार.
Updated On:

Water Cut Pune – शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशनमध्ये तातडीच्या विद्युत, पंपिंग व स्थापत्य दुरुस्ती कामांमुळे येत्या गुरुवारी (दि. २३) रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवार मध्यरात्री १२ वाजल्यापासून गुरुवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणी बंद असणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
त्यामध्ये नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (५०० एमएलडी), जुने पर्वती केंद्र, वडगाव, वारजे, लष्कर, भामा आसखेड, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, तसेच खडकवासला जॅकवेलसह अनेक महत्त्वाच्या केंद्रांवर देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे, तर दुसऱ्या दिवशी सकाळी (२४ एप्रिल) रोजी कमी दाबाने व उशिरा पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. महापालिकेकडून मागील गुरुवारी हा पाणीबंद निश्चित करण्यात आला होता. मात्र, त्याच दिवशी शहरातील काही भागातील खासगी टँकरचालकांनी बंद पुकारल्याने हा पाणी बंद रद्द करण्यात आला होता.




