Pro Kabaddi 2024 : टेबल टॉपर हरियाणा स्टीलर्सला पराभवाचा धक्का, तेलुगू टायटन्सनं नोंदवला धमाकेदार विजय…

Pro Kabaddi 2024 (Haryana Steelers vs Telugu Titans) : प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi 2024) च्या 61 व्या सामन्यात तेलुगू टायटन्सने जबरदस्त कामगिरी करत टेबल टॉपर हरियाणा स्टीलर्सचा 49-27 असा लाजिरवाणा पराभव केला. तेलुगू टायटन्सने तब्बल 22 गुणांनी विजय मिळवला.
పవనుడు లేకపోయినా.. 😎
టైటన్స్ పెర్ఫార్మన్స్ ఇరగదీసేసారు కదూ 🤩టైటన్స్ డామినెన్స్ పెరఫార్మన్స్ 💥
మీకు నచ్చితే ❤ కామెంట్ చెయ్యండి 👇🏻#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #HaryanaSteelers #TeluguTitans pic.twitter.com/YOOOsQxgA4— ProKabaddi (@ProKabaddi) November 18, 2024
टायटन्सचा हा सहावा विजय असून 32 गुणांसह ते सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. सलग 5 सामने जिंकल्यानंतर हरियाणाला पहिल्यांदा पराभव पत्करावा लागला असला तरी ते अजूनही पहिल्या स्थानावर कायम आहेत.
Pro Kabaddi 2024 : थरारक सामन्यात गतविजेते पुणेरी पलटण पराभूत, जयपूर पिंक पँथर्सनं मारली बाजी….
प्रो कबड्डी 2024 च्या या सामन्यात आशिष नरवालने रेडिंगमध्ये तेलुगू टायटन्ससाठी सर्वाधिक 11 रेड पॉइंट घेतले तर सागर आणि शंकर यांनी बचावात हाई 5 लगावले. हरियाणा स्टीलर्सकडून राहुल सेतपालने सर्वाधिक 6 गुण घेतले. शादुल आणि जय सूर्याने सामन्यात प्रत्येकी 5 गुण घेतले.





