Pro Kabaddi 2024 (Jaipur Pink Panthers vs Puneri Paltan) : प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi 2024) च्या 60 व्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटणचा 30-28 असा पराभव करून रोमांचक विजय नोंदवला. पिंक पँथर्सचा 10 सामन्यांनंतरचा हा 5वा विजय आहे आणि ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. गतविजेते पुणेरी पलटण 34 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
पैंथर्स ने पलटन को चटाई धूल 🥵🔥
आपको हल्की सर्द में इस कड़क मुक़ाबले का कौन सा पल धमाकेदार लगा? 🤔#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #JaipurPinkPanthers #PuneriPaltan pic.twitter.com/Rec8Q57Lp0
— ProKabaddi (@ProKabaddi) November 17, 2024
पहिल्या सत्रात जयपूर पिंक पँथर्सने 19-12 अशी आघाडी घेतली होती. जयपूर पिंक पँथर्सने सामन्याची शानदार सुरुवात केली आणि पुणेरी पलटणवर झटपट दडपण आणले. त्यानी सहाव्या मिनिटालाच प्रथमच गतविजेत्याला ऑलआऊट केले आणि सामन्यात आघाडी घेतली. आकाश शिंदे मॅचचा शेवटचा रेड टाकण्यास आला होता, पण अंकुशने त्याला हुशारीनं टॅकल केले. यासह जयपूर पिंक पँथर्सने प्रो कबड्डी 2024 चा हा सामना जिंकला. पुणेरी पलटणने जोरदार पुनरागमन केले, पण सुरुवातीला त्यांनी दाखवलेला खराब खेळ शेवटी त्यांच्या विरोधात गेला आणि त्यांना अवघ्या एका गुणावर समाधान मानावे लागले.
Pro Kabaddi 2024 : हरियाणा स्टीलर्स विजयासह अव्वल स्थानी, तमिळ थलैवाजला केलं पराभूत…
जयपूर पिंक पँथर्ससाठी प्रो कबड्डी 2024 च्या या सामन्यात, अर्जुन देशवालने चढाईत सर्वाधिक 8 रेड पॉइंट घेतले आणि अंकुश राठीने बचावात 6 टॅकल पॉइंट घेतले. पुणेरी पलटणसाठी आकाश शिंदेने चढाईत 7 रेड पॉइंट घेतले आणि बचावात गौरव-अमानने प्रत्येकी तीन टॅकल पॉइंट घेतले.