Janhvi Killekar: ‘नवऱ्यासोबत फोटो का नाही शेअर करत?’ नेटकऱ्याच्या प्रश्नावर जान्हवीने दिलं उत्तर
Janhvi Killekar: फोटोमध्ये जान्हवी आणि तिचा मुलगा स्विमिंग पूलमध्ये मज्जा मस्ती करताना दिसले.

Janhvi Killekar: अभिनेत्री जान्हवी किल्लेकरला ‘बिग बॉस मराठी सीजन 5’मुळे मोठी लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोवर्स देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोशल मीडियावरही ती अनेक फोटो शेअर करते.
नुकतेच जान्हवीने मुलासोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. फोटोमध्ये जान्हवी आणि तिचा मुलगा स्विमिंग पूलमध्ये मज्जा मस्ती करताना दिसले. दोघांचे फोटो सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाले. पण काही नेटकऱ्यांनी दोघांचे फोटो खटकले.
एका नेटकऱ्याने कमेंट करत जान्हवीला पतीवरून प्रश्न विचारला. ‘मॅम तुम्ही तुमच्या मिस्टर सोबत कधीच फोटो पोस्ट का करत नाही?’ असे विचारतच जान्हवीने सुद्धा मनमोकळेपणाने उत्तर दिले. (Janhvi Killekar)
तिने लिहिले की त्यांना नाही आवडत फोटो काढायला, कारण काही मूर्ख लोक त्याला ट्रॉल करायला मोकळे असतात…. म्हणून आम्ही फोटो काढणं अवॉइड करतो. जान्हवीच्या या कमेंट वर अनेकांनी तिला समर्थन दर्शवले आहे. तर बरेच जणांनी अशा लोकांना दुर्लक्षित करण्याचा सल्ला देखील दिला आहे. (Janhvi Killekar)
जान्हवी किल्लेकर हिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेमुळे लोकप्रिय झाली. त्यानंतर तिने कलर्स मराठी वाहिनीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ आणि ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकांमध्ये काम केले. बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर ती ‘द फिफ्टी’ या हिंदी रिअॅलिटी शोमध्ये सुद्धा दिसली होती. (Janhvi Killekar)
इंधन दरवाढीचा महाविस्फोट.. ! देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ






