Viral Video : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यकडे पाहिले जात होते. पण दोघेही विभक्त झाले असून त्यांच्या नवीन आयुष्यात आनंदात आहेत. आता हे दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हैदराबादमध्ये पार पडलेल्या एका हाय-प्रोफाईल वेडिंग रिसेप्शनमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. निर्माते सुनील नारंग यांची मुलगी सिमरन नारंगच्या रिसेप्शनला टॉलीवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये चिरंजीवी आणि नागार्जुन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र सर्वांचे लक्ष समंथा आणि नागा चैतन्य यांच्या उपस्थितीकडेच लागले होते. दोघेही आपल्या-आपल्या जोडीदारांसोबत वेगवेगळ्या वेळेत या कार्यक्रमाला पोहोचले. समंथा तिचा पती दिग्दर्शक आणि निर्माता राज निदिमोरू सोबत हजर होती. पारंपरिक जांभळ्या आणि सोनेरी साडीत ती खूपच आकर्षक दिसत होती. तर दुसरीकडे नागा चैतन्य त्याची पत्नी अभिनेत्री सोभिता धुलिपाला सोबत कार्यक्रमात सहभागी झाला होता. दोघांनीही कॅमेऱ्यासमोर पोज देत नवविवाहितांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात समंथा आणि नागा चैतन्य यांच्यात कोणताही संवाद झाल्याचे समोर आलेले नसले तरी, बर्याच काळानंतर त्यांना एकाच ठिकाणी पाहणे चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. View this post on Instagram A post shared by Filmymantra Media (@filmymantramedia) नागा चैतन्य आणि सामंथा यांची प्रेमकथा एकेकाळी टॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेचा विषय होती. ये माया चेसावे या चित्रपटातून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 2017 मध्ये त्यांनी लग्न केले. मात्र 2021 मध्ये दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता दोघेही वेगळ्या मार्गाने आपआपले नवे आयुष्य जगत आहेत. हेही वाचा : Anupam Kher post : “चेहऱ्यावरील छोट्यात छोटा हावभावही…”; तो फोटो शेअर करत अनुपम खेर यांची भावनिक पोस्ट