Satara News : कोयना विभागात दूरसंचार सेवा 4 दिवसापासून ठप्प

कोयनानगर : “डिजिटल इंडिया” संकल्पनेच्या गजरात देशभर तंत्रज्ञानावर भर दिला जात असताना, महाराष्ट्रातील कोयना विभागात गेल्या चार दिवसांपासून बीएसएनएलची सेवा पूर्णतः बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दूरसंचार यंत्रणेशिवाय दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून, बँकिंग, वैद्यकीय सेवा, ऑनलाईन शिक्षण आणि व्यवसाय यावर गंभीर परिणाम झाला आहे. नेटवर्क गायब झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी बीएसएनएलच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
कोयना विभागातील अनेक गावांमध्ये बीएसएनएलचे नेटवर्क पूर्णतः बंद आहे. यामुळे कोयना धरण,कोयना जलविद्युत प्रकल्प आदी सरकारी कार्यालयांपासून ते बँका आणि आरोग्य केंद्रांपर्यंत सगळ्याच सेवा ठप्प झाल्या आहेत. विशेषतः बँकांमध्ये ऑनलाईन व्यवहार बंद पडल्याने ग्राहकांचे मोठे हाल सुरू आहेत. स्थानिक व्यावसायिक, दुकानदार आणि शेतकरी यांना डिजिटल पेमेंट बंद पडल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने नागरिक कोणाशीही संपर्क साधू शकत नाहीत.
विशेषतः लँडलाईन सेवा ठप्प झाल्यामुळे काही ठिकाणी अत्यावश्यक वैद्यकीय मदत मिळवणेदेखील कठीण झाले आहे. बीएसएनएल सेवा ठप्प झाल्यानंतर अनेक नागरिकांनी स्थानिक बीएसएनएल कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुठलीही ठोस माहिती मिळू शकली नाही. कोयना विभागातील नागरिक आणि व्यावसायिक यांची मोठी आर्थिक आणि सामाजिक हानी होत आहे. बीएसएनएलच्या सेवेत सुधारणा न झाल्यास नागरिकांना अन्य पर्याय शोधावे लागतील. यासाठी सरकारने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी कोयना विभागातून होत आहॆ.
संतप्त नागरिकांचे बीएसएनएलवर आरोप
1. BSNLची सेवा सतत विस्कळीत होत असून, कंपनीकडून कुठलीही सुधारणा केली जात नाही.
2. तक्रारी केल्या तरी उत्तर मिळत नाही; अधिकारी फोन उचलत नाहीत.
3. डिजिटल सेवांवर सरकार भर देत असले तरी कंपन्याकडून हरताळ





