Telangana Election Result 2023: तेलंगणात काँग्रेसची मोठी तयारी सुरू; आमदारांसाठी हॉटेल बाहेर लक्झरी बसेस सज्ज

Telangana Election Result 2023: तेलंगणामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीनुसार काँग्रेस ने बीआरएसला तगडी टक्कर दिली आहे. तेलंगणात काँग्रेस पक्षाने 59 जागांवर विजय मिळवला आहे. तेलंगणात काँग्रेस आघाडीवर येताच तेथील कार्यकर्त्यांनी काँग्रेस हैदराबादमधील पक्षाच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले. तसेच घोडेबाजार टाळण्यासाठी तेलंगणात काँग्रेसने मोठी तयारी केली आहे. काँग्रेसने हैदराबादच्या ताज कृष्णा येथे लक्झरी बसेस उभ्या करण्यात आल्या आहेत.
तेलंगणातील काँग्रेस पक्षाने आपल्या आमदारांना प्रतिस्पर्ध्यांकडून होणाऱ्या संभाव्य शिकारीपासून वाचवण्यासाठी, गरज पडल्यास त्यांना हलवण्यासाठी हैदराबादमधील हॉटेलमध्ये बसेस तयार ठेवल्या आहेत. एका खाजगी ट्रॅव्हल्स ऑपरेटरच्या बसेस ताज कृष्णा हॉटेलमध्ये दिसल्या, जेथे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि एआयसीसीचे इतर निरीक्षक तळ ठोकून आहेत. तसेच मतमोजणीच्या कलवर निरीक्षक लक्ष ठेवून असून राज्य पक्षाच्या नेत्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Telangana | Luxury buses have been stationed at Hyderabad’s Taj Krishna. pic.twitter.com/1hJsAsfJrd
— ANI (@ANI) December 3, 2023
शिवकुमार आणि काही कॅबिनेट सहकाऱ्यांसह शुक्रवारी रात्री उशिरा बेंगळुरूहून एका विशेष विमानाने हैदराबादला पोहोचले. यावेळी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएम डीके शिवकुमार की, “मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव विजयी उमेदवारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्रिशंकू विधानसभा झाल्यास बीआरएस आमचे आमदार फोडू शकते. बीआरएस काँग्रेस पक्षातील अनेक बड्या नेत्यांना मंत्रीपद देऊ शकते,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, 119 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसला 70 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास तेलंगणाचे काँग्रेसचे निरीक्षक प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला. तर आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, काँग्रेसने 59, BRSने 39 आणि भाजपने 9 जागांवर विजय मिळवला आहे. ही आकडेवारी निवडणूक निकाल नसून सुरुवातीचे कल आहेत.





