Telangana Assembly Elections 2023 : तेलंगणात सीएमपदासाठी भाजप ओबीसी नेत्याचे नाव करू शकते फायनल, जाणून घ्या यामागचे मोठे कारण

Telangana Assembly Elections 2023 : भारतीय जनता पक्ष तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून ओबीसी (इतर मागासवर्गीय) नेत्याचे नाव फायनल होऊ शकतो.पक्षाची केंद्रीय स्क्रिनिंग समिती पहिली यादी अंतिम करण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे नेते आणि या प्रकरणाशी संबंधित लोकांनी ही माहिती दिली.
केंद्रीय पर्यटन मंत्री आणि तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य आणि खासदार के लक्ष्मण बुधवारी संध्याकाळी केंद्रीय स्क्रीनिंग समितीकडून मंजुरी मिळविण्यासाठी उमेदवारांच्या सुमारे 40 नावांची यादी घेऊन नवी दिल्लीला रवाना झाले.
या संपूर्ण घटनेची माहिती असलेल्या भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, ‘भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बंदी संजय यांनाही समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडून फोन आला होता. पुढील एक-दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
ओबीसी चेहरा लक्षात घेऊन भाजपचे केंद्रीय नेतृत्व
भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार, भाजपचे केंद्रीय नेतृत्व आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षावर बाजी मारण्यासाठी ओबीसी नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचा विचार करत आहे. ते म्हणाले, “राज्यातील नेत्यांना आज तसे संकेत मिळाले आहे, परंतु भाजप हायकमांड कोणते नाव जाहीर करेल किंवा पक्ष सत्तेवर आल्यास ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री केले जाईल की नाही हे लगेच कळत नाही.”
ओबीसी नेत्यांमध्ये ही नावे प्रमुख
तेलंगणा भाजपच्या ओबीसी नेत्यांमध्ये प्रमुख खासदार के लक्ष्मण आहेत, जे भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचेही प्रमुख आहेत. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष बंदी संजय आणि हुजूराबादचे आमदार एटाळा राजेंद्र यांच्या नावांचा समावेश आहे.
भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, ‘पक्षाचा विश्वास आहे की ओबीसी नेत्याला पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून घोषित केल्याने पक्षाला मोठा फायदा होईल, कारण या विभागातील कोणीही संयुक्त आंध्र प्रदेश किंवा तेलंगणाचा मुख्यमंत्री झालेला नाही. ते म्हणाले की पक्षाने आधीच जाहीर केले आहे की 35% उमेदवार ओबीसीचे असतील.





