Ajit Pawar : चार राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या निकालानुसार भाजपने तीन राज्यात मुसंडी मारली आहे. तर तेलंगणामध्ये कॉँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे. समोर आलेल्या या आकडेवारीनंतर आता विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील तीन राज्यातील भाजपच्या निकालानंतर आनंद व्यक्त केला आहे. आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झाले असल्याचे अजित पवारांनी म्हंटले आहे. अजित पवार म्हणाले, “निकाल चांगला येणार हे मी आधीच बोललो होतो. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. इंडियावाले आता ईव्हीएमबाबत बोलतील. ईव्हीएम घोटाळा हा रडीचा डाव आहे. मोंदींसमोर कोण उमेदवार असणार आहे हे सुद्धा विरोधकांचं ठरलं नाही. जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य केला पाहिजे. ईव्हीएम घोटाळा एकाला शक्य नाही. तीन राज्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात देखील लोकसभा जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार अहोत. 48 पैकी 45 जागा आम्ही निवडून आणणार आहोत,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात मोठे खुलासे केले होते. त्यानंतर शरद पवारांवर देखील या आरोपला प्रत्युत्तर दिले होते. त्याबाबत अजित पवार म्हणाले, . मी अनेक वर्ष सत्तेत आहे. मला खोट बोलत येतं नाही. काहीजण दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनां प्रतिनिधी केलं आहे. आम्ही काही चांगलं करत आहोत. यासाठी नरेंद्र मोदी अमित शाह यांची मदत घेऊन महाराष्ट्राला एक नंबर करण्याच काम करत आहोत, असे अजित पवार म्हणाले.