Tejaswini Pandit : “डोक्यावरुन कुणी मायेचा हात फिरवणार नाही”, आई-वडिलांच्या आठवणीत तेजस्विनीची भावुक पोस्ट
Tejaswini Pandit : 'लहान वयातच आई-वडिलांना गमावल्यानंतर, काहीच पूर्वीसारखं वाटत नाही'

Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे मागील वर्षी निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. यानंतर आता आई-वडिलांच्या आठवणीत अभिनेत्री तेजस्विनी पंडितने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
‘आई-वडील गेल्यावर आपल्या मनाच्या कोपऱ्यात एक कायमची पोकळी निर्माण होते. जी कधीच कुणीही भरुन काढू शकत नाही. आणि ही गोष्ट कुणीही नाकारु शकत नाही’, असं तिने म्हटलं आहे.
तेजस्विनी पंडितची पोस्ट
तेजस्विनी पंडितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत भावनिक कॅप्शनही दिलं आहे. तिने म्हटले की, ‘ही काही रँडम पोस्ट नाही.आई गेल्यापासून सोशल मीडियावर जास्त व्यक्त होता आलं नाही.
किंबहुना नाहीच. कदाचित या व्यासपीठावर माझ्या पालकांविषयी स्पष्टपणे व्यक्त होण्याची ही शेवटचीच वेळ असेल. आई – बाबा मला नेहमी म्हणायचे की, माणसाने नेहमी शिकत राहिले पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत शिकत राहिलं पाहिजे’.
View this post on Instagram
दाराकडे डोळे लावून वाट पाहणारं कुणी नसतं
‘आई – वडील गेल्यानंतर मुलांना एकट्याने मोठं व्हायला आपसूक येत नाही. ते शिकावं लागतं. 1-1 पाऊल आपल्याला पुढे टाकावं लागतं. झोप किंवा थकवा येत असेल तर, आपल्या डोक्यावरुन कुणी मायेचा हात फिरवणार नाही, हे गृहित धरावं लागतं. आपली दाराकडे डोळे लावून वाट पाहणारं कुणी नसतं.
वाट बघायला लावणारंही कुणी नाही, या गोष्टी समजून घ्यावं लागतं. आमचे आई वडील दोघांनीही अचानक आमची साथ सोडलीय. लहान वयातच आई-वडिलांना गमावल्यानंतर, काहीच पूर्वीसारखं वाटत नाही, कोणतीही कामगिरी आता कामगिरी वाटत नाही! बाबा जाऊन 11 वर्षे झालीत आणि आई जाऊन एक वर्ष…’.
तुम्हाला खऱ्या अर्थाने मोठं व्हावं लागतं
‘कदाचित दु:ख शेवटी कमी होईल, परंतु अशा प्रकारचे नुकसान कधीही सोडत नाही. आणि ना तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त बदलून जाता. तुमच्या आत काहीतरी बदलते. बहुतेक लोकांना समजत नसेल किती मनाचं ओझं तुम्ही उचलता. अशावेळी तुम्हाला खऱ्या अर्थाने मोठं व्हावं लागतं. कारण आता आयुष्य आणि त्यातले अनुभव तुमचे पालक होतात. चांगलं – वाईट सगळं शिकवतात’, असं तेजस्विनी पंडितने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
हेही वाचा:
Crime News: कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून; अल्पवयीन मुलावरही चाकूने हल्ला





