Amruta Dhongade : अमृता धोंगडेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन; खलनायिकेची साकारणार भूमिका
Amruta Dhongade : 'आमच्या लाडक्या नाईक बाई' या मालिकेत दर्शना लाड ही भूमिका अमृता साकारणार

Amruta Dhongade : अभिनेत्री अमृता धोंगडे पुन्हा एकदा मालिका विश्वात पदार्पण करणार आहे. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत ती दर्शना लाड या खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मालिकेत मुख्यभूमिकेत पाहायला मिळणार आहे. यात ऐश्वर्या नारकर ‘शारदा नाईक’ उर्फ ‘नाईक बाई’ ही भूमिका साकारत आहेत.
अमृताच्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर, दर्शना लाड उर्फ लाडबाई ही नावाप्रमाणेच गोड बोलणारी, पण तितकीच धूर्त आणि कपटी स्वभावाची आहे. एका राजकीय पक्षाच्या वतीने गावातील जमिनींवर कब्जा मिळवण्याचं मिशन घेऊन ती गावात येते. (Amruta Dhongade)
आपल्या गोड बोलण्याने चलाख पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यात ती पटाईत आहे. नाईक बाईंच्या आयुष्यात नवनवे अडथळे निर्माण करण्याचा लाडबाई प्रयत्न करणार असल्याचे यात पाहायला मिळणार आहे. (Amruta Dhongade)
View this post on Instagram
या भूमिकेविषयी अभिनेत्री अमृता धोंगडे पाटील म्हणाली, “दोन वर्षांनंतर पुन्हा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येताना खूप उत्सुकता वाटते आहे. ‘दर्शना लाड’ ही भूमिका माझ्यासाठी खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. ती गोड बोलते, पण तिच्या प्रत्येक कृतीमागे एक वेगळा हेतू असतो. पहिल्यांदा खलनायिका साकारतेय आणि अशाव्यक्तिरेखा साकारण्याची एक वेगळीच मजा असते. प्रेक्षकांना ही भूमिका नक्कीच आवडेल अशी आशा आहे.” (Amruta Dhongade)
अमृता धोंगडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेमुळे तिला मोठी ओळख मिळाली. यानंतर बिग बॉस मराठी सीजन ४ या रिअॅलिटी शोमध्ये ती दिसली. (Amruta Dhongade)
हेही वाचा :
Maharashtra Doctors Strike: राज्यभरात निवासी डॉक्टरांचा संप; रुग्णालयातील सेवा विस्कळीत?





