Urmila Kanetkar :घटस्फोटानंतर ऊर्मिला कानेटकरची पोस्ट, म्हणाली “कर्माची एक धक्कादायक…”
Urmila Kanetkar: उर्मिला कानेटकरने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही.

Urmila Kanetkar Post : अभिनेता आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. मराठी इंडस्ट्रीतल्या पॉवर कपलचा संसार मोडल्यानं अनेकांना धक्का बसला. अशातच घटस्फोटाच्या 21 दिवसांनी मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकरनेआपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
उर्मिलाने आपल्या इन्स्टा स्टोरीवरच्या पोस्टवर लिहिलले की, “परिस्थिती हाताळण्याची कर्माची एक धक्कादायक अन् अनोखी पद्धत असते. तुम्हाला फक्त शांतपणे बसून ते पाहायचे असते…” उर्मिला कानेटकरनं आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही, तसेच ना त्यांनी कोणत्याही घटनेचा उल्लेख केला आहे.
मात्र तिच्या या पोस्टचे अनेक अर्थ लावले जात आहेत. काही नेटकऱ्यांच्या मते, हा संदेश तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अलीकडील घडामोडींशी संबंधित असू शकतो. मात्र, याबाबत उर्मिलानं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
दरम्यान, ‘शुभमंगल सावधान’ सिनेमादरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती. नायिका म्हणून उर्मिलाचा तो पहिलाच चित्रपट होता आणि त्या चित्रपटात आदिनाथ सहाय्यक दिग्दर्शक होता. सेटवर दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्याचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं होतं.
यानंतर २० डिसेंबर २०११ रोजी ही जोडी विवाहबद्ध झाली आणि दोघांना एक मुलगी देखील आहे. मात्र लग्नानंतर १५ वर्षांनी आदिनाथ-उर्मिलाने विभक्त होणार असल्याचं जाहीर केलं.
हेही वाचा :






