Tejashwi Yadav : पराभव दिसल्यानेच पंतप्रधान मोदींचा बिहार दौरा रद्द; तेजस्वी यादव यांचा दावा
बांकेपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचे आणि विद्यार्थ्यांमधील असंतोष पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला बिहार दौरा रद्द केला, असा थेट दावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी केला आहे.

Tejashwi Yadav : बांकेपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचे आणि विद्यार्थ्यांमधील असंतोष पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला बिहार दौरा रद्द केला, असा थेट दावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी केला आहे.
पंतप्रधान एका पुलाचे उद्घाटन करण्यासाठी बिहारमध्ये येणार होते, परंतु पराभवाच्या भीतीपोटी त्यांनी हा दौरा रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला. या दौऱ्याबाबत भाजप किंवा राज्य सरकारकडून (Tejashwi Yadav) कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या बांकेपूर विधानसभेच्या जागेसाठी ३० जुलै रोजी मतदान होणार आहे.
या जागेवर आरजेडडीने गेल्या निवडणुकीतील उपविजेत्या रेखा गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर आणि भाजपचे उमेदवार नीरा कुमार सिन्हा यांच्यात प्रमुख लढत मानली जात आहे. प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे आणि ती ते हारणार आहेत.
पंतप्रधान मोदी या निवडणुकीत भाग घेण्यासाठी आणि एका पुलाचे उद्घाटन करण्यासाठी बिहारला येणार होते, पण पक्षाचा पराभव होणार हे स्पष्ट दिसल्याने त्यांनी आपला दौरा रद्द केला.
पेपर लीक प्रकरणावरून झालेल्या आंदोलनानंतर बिहार सरकारने आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची आणि अटक केलेल्यांची सुटका करण्याची घोषणा केली आहे. यावर बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, केवळ गुन्हे मागे घेणे पुरेसे नाही. २५ जुलै रोजी आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, या माझ्या मागणीवर मी अजूनही ठाम आहे.
डाव्या विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या बिहार बंद’दरम्यान सिवान जिल्ह्यात झालेल्या या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झाले नव्हते. या घटनेनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
आरजेडीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी एक महत्त्वाचे आश्वासन देताना सांगितले की, त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्या जेपी सेनानींना ज्याप्रमाणे निवृत्ती वेतन (पेंशन) दिले जाते, त्याच धर्तीवर अलीकडील विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना निवृत्ती वेतन दिले जाईल.






