Tejashwi Yadav : सम्राट चौधरी हे ‘रबर स्टॅम्प’ मुख्यमंत्री; तेजस्वी यादव यांची टीका
बिहारमधील वाढती गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी रविवारी एनडीए सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला.

Tejashwi Yadav : बिहारमधील वाढती गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी रविवारी एनडीए सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला.
सम्राट चौधरी हे केवळ ‘रबर स्टॅम्प’ आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. काही मोजकेच नोकरशहा राज्य चालवत असून मुख्यमंत्री केवळ वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करत आहेत, अशी टीका यादव यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते यादव (Tejashwi Yadav) यांनी राज्याच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, सरकारी तिजोरी रिकामी असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतन रखडले आहे. विकासकामांसाठी नियमित अर्थसंकल्पीय तरतूद नसल्याने राज्य सरकारला ‘आकस्मिक निधी’तून ३,६६० कोटी रुपये काढावे लागले आहेत.
कथित टेंडर घोटाळ्याचा उल्लेख करत त्यांनी भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ‘विशेष दक्षता पथका’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात केवळ सात जणांची नावे असून, बड्या धेंडांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. या घोटाळ्यात केवळ एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, या निविदा घोटाळ्याप्रकरणी ‘एसव्हीयू’ने एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यासह सात जणांवर (Tejashwi Yadav) आरोपपत्र दाखल केले असून, गेल्या महिन्यात दोन आयएएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.






