Tejashree Pradhan: ‘माझा प्रवास आता अधिक सुखद होत चालला’; तेजश्री प्रधानने दिले सरप्राइज
Tejashree Pradhan: मागील महिन्यात तेजश्रीने आपला वाढदिवस साजरा केला

Tejashree Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या ‘वीण दोघातलेही तुटेना’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील तेजश्रीच्या ‘स्वानंदी’ या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तेजश्री प्रधानने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक गूड न्यूज शेअर केली आहे.
तेजश्रीनं मर्सिडीज कार खरेदी केली आहे. ड्रायव्हिंग सीटवर बसून तिनं स्वतःचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोत गाडीचं लक्झरी इंटिरिअर आणि सनरूफ सुद्धा पाहायला मिळत आहे. तसेच, फोटोतल्या गाडीच्या स्टिअरिंगवर मर्सिडीज कारचा लोगो दिसत आहे. पिस्ता रंगाच्या साडीत तेजश्री खूपच सुंदर दिसते.
मात्र तेजश्रीची नवीकोरी आलिशान गाडी तिनं स्वतःला दिलेलं बर्थडे गिफ्ट आहे. मागील महिन्यात तेजश्रीने आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर महिन्याभरानं तिने आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
View this post on Instagram
तेजश्री प्रधान हिनं पोस्ट शेअर करुन आपल्या गाडीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तेजश्रीनं लिहिलंय की, “.. आणि जवळपास एक महिना उलटून गेला… माझा प्रवास आता अधिक सुखद होत चालला आहे!” सध्या तिच्या या पोस्टवर कमेंटचा वर्षाव होत आहे. तर सुबोध भावेनंही तेजश्रीच्या पोस्टवर कमेंट करत “अरे कधी घेतलीस नवीन गाडी??? MY GOD ……अभिनंदन”, असे लिहिले आहे.
तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचे तर, ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर विविध भूमिका साकारत मालिकांसह चित्रपटांत काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करत आहे.
हेही वाचा:





