Tehsildar Arrested : तहसीलदाराने वर्षभराच्या पगाराएवढी घेतली लाच; राज्यात खळबळ
Tehsildar Arrested : तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे.

Tehsildar Arrested : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनात चर्चांना उधाण आले आहे. (Tehsildar Arrested)
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीसंदर्भातील प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तसेच वाळू वाहतूक करणारे सहा ट्रक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यासाठी तहसीलदारांनी मोठ्या रकमेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. (Tehsildar Arrested)
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने सापळा रचला. त्यानुसार शनिवारी तहसीलदार विजय चव्हाण हे 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. (Tehsildar Arrested)
ही कारवाई बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. (Tehsildar Arrested)
दरम्यान, बीड जिल्ह्यातही लाचखोरीची आणखी एक घटना समोर आली आहे. विमा दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात 15 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एका पोलीस अमलदाराला अटक करण्यात आली आहे. (Tehsildar Arrested)
दत्तात्रय बळवंत असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तक्रारदाराकडून 10 हजार रुपये स्वीकारताना जालना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. सलग उघडकीस येणाऱ्या लाचखोरीच्या घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (Tehsildar Arrested)





