‘महाराणा प्रताप’ सिरीजचा टीजर रिलीज ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

मुंबई – इतिहासात महाराणा प्रताप या शूर वीर योद्ध्याची एक वेगळी ओळख पाहायला मिळते. आजवर तुम्ही महाराणा प्रताप यांचा इतिहास सिनेमांमधून किंवा टीव्ही मालिकांमधून पण पहिला असले. महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित वेब सिरींजची घोषणा केली आहे. ज्याचे शूटिंग देखील सुरु करण्यात आले असून लवकरच ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिरीजची निर्मिती ट्रिमिटिक प्रॉडक्शन करत आहे. तर सेट डिझायनिंग करणारे ज्येष्ठ नितीन चंद्रकांत देसाई हे शो रनर म्हणून काम पाहणार आहेत. महाराणा प्रताप यांच्याबाबतचा काही रंजक इतिहास आम्हाला सर्वांसमोर आणायचा असल्याचे देसाई यांनी सांगितले.
View this post on Instagram
2012 मध्ये, महाराणा प्रतापवर एक पूर्ण चित्रपट देखील आला होता. ज्याचे शीर्षक महाराणा प्रताप – द फर्स्ट फ्रीडम फायटर होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. प्रदीप कुमावत यांनी केले होते. या चित्रपटात महाराणा प्रताप यांच्या अकबराशी झालेल्या संघर्षाचे चित्रण करण्यात आले होते.परंतु आता हॉटस्टारवरील या नव्या कोऱ्या सिरीजची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.




