India’s Tour of South Africa : आफ्रिकेविरूध्दच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रमणदीपसह ‘या’ युवा खेळाडूंना मिळाली संधी…

India’s Tour of South Africa :- आगामी दक्षिण आफ्रिका संघाबरोबर होणाऱ्या 3 टी-20 सामान्यांसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी उशिरा करण्यात आली असून या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
युवा वेगवान गोलंदाज मयांक यादव व फलंदाज शिवम दुबे हे दोघेही दुखापतग्रस्त असल्याने या दोघांचा समावेश संघात करण्यात आला नाही. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या 27 वर्षीय रमणदीप सिंगचा प्रथमच या संघात समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेश संघाविरुद्ध शानदार खेळी करणाऱ्या रियान परागचा दुखापतीमुळे या संघात समावेश करण्यात आलेला नाही. आफ्रिकेतील वेगवान खेळपट्ट्यावर आवेश खान, अर्शदीप सिंग, यश दयाल यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
संघ पुढील प्रमाणे : सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाक, आवेश खान, यश दयाल.
भारत – दक्षिण आफ्रिका वेळापत्रक
पहिला सामना : 8 नोव्हेंबर : डर्बन
दुसरा सामना : 10नोव्हेंबर : गकेबेर्हा
तिसरा सामना : 13 नोव्हेंबर : सेंच्युरियन






