Border-Gavaskar Trophy 2024-25 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, या ‘3’ नवीन खेळाडूंना मिळाली संधी…

Border-Gavaskar Trophy 2024-25 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळणार असून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले आहे तर संघात 3 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी नितीश कुमार रेड्डी यांची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. वॉशिंग्टन सुंदरचे संघातील स्थान कायम ठेवण्यात आले आहे. सलामीवीर अभिमन्यू इसवरनची कर्णधार रोहित शर्मासाठी कव्हर म्हणून निवड करण्यात आली आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर पडले आहेत.
🚨 NEWS 🚨
Squads for India’s tour of South Africa & Border-Gavaskar Trophy announced 🔽#TeamIndia | #SAvIND | #AUSvIND pic.twitter.com/Z4eTXlH3u0
— BCCI (@BCCI) October 25, 2024
याचबरोबरीने गेल्या काही दिवसांपासून धावा करण्यासाठी झगडणाऱ्या के.एल. राहुलवर देखील बीसीसीआयने विश्वास दर्शविला आहे. दुखापतींनी त्रस्त असणाऱ्या मोहम्मद शमी व मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये धावांचा रतीब घालणाऱ्या चेतेश्वर पुजाराला या संघात संधी मिळाली नाही. बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्ध असणारा बहुतांश संघ बॉर्डर गावस्कर मालिकेसाठी कायम ठेवला आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान , ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी : 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी : 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र)
तिसरी कसोटी : 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी : 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी : 3-7 जानेवारी, सिडनी





