Gujarat Titans Dominate : टीम इंडियात ‘गुजरात टायटन्स’चा बोलबाला! अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तब्बल ११ खेळाडूंचा समावेश
Gujarat Titans Dominate : एकेकाळी टीम इंडियात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा टीम इंडियात बोलबाला असायचा. मात्र, यंदा गुजरात टायटन्सच्या खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

Gujarat Titans players dominate Team India : बीसीसीआयने मंगळवारी (१९ मे) अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी एकमेव कसोटी आणि ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. दोन्ही फॉरमॅटसाठी प्रत्येकी १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली असून नियमित कर्णधार शुबमन गिल याच्याकडेच नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. मात्र, या संघ निवडीनंतर एक अत्यंत रंजक आणि धक्कादायक बाब समोर आली आहे. या दोन्ही संघांमध्ये मिळून तब्बल ११ खेळाडू हे सध्या आयपीएल २०२६ मध्ये ‘गुजरात टायटन्स’ संघाकडून खेळत आहेत.
गुजरात टायटन्सनेच पोस्ट शेअर करून केला खुलासा!
भारतीय संघात गुजरात टायटन्सच्या खेळाडूंचा मोठा भरणा असल्याचे स्वतः या फ्रेंचायझीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून जाहीर केले आहे. दोन्ही फॉरमॅटचा विचार केला तर कसोटी संघात गुजरातचे ७ खेळाडू आहेत, ज्यात कर्णधार शुबमन गिलसह साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुथार आणि गुरनूर बराड यांचा समावेश आहे. तर वनडे संघात शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिध कृष्णा आणि गुरनूर बराड हे गुजरातचे ४ खेळाडू खेळताना दिसतील.
4 Gujarat Titans players in the ODIs,
7 Gujarat Titans players in the Test.– Gujarat Titans lobby has arrived to replace Mumbai Lobby. pic.twitter.com/E0suyLUFRu
— Ahmed Says (@AhmedGT_) May 19, 2026
कसोटी आणि वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक –
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव ऐतिहासिक कसोटी सामना ६ जून २०२३ पासून न्यू चंदीगड येथील ‘महाराजा युद्धवीर सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम’वर खेळवला जाईल.
यानंतर १४ जूनपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. पहिला वनडे सामना १४ जून रोजी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसरा सामना १७ जून रोजी लखनऊच्या इकाना स्टेडियमवर होईल, तर मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना २० जून रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल.
भारताचा कसोटी संघ: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर बराड, ध्रुव जुरेल, हर्ष दुबे.
GT at the heart of Captain Gill’s Team India for the ODI & Test Series 🆚 Afghanistan! 🇮🇳 pic.twitter.com/yOaBX3qMRV
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 19, 2026
भारताचा वनडे संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर बराड, हर्ष दुबे.





