IND VS ENG 2nd ODI : रोहित शर्माच्या शतकासह टीम इंडियाने जिंकली इंग्लडविरुद्धची मालिका

ओरिसाच्या कटकमधील बाराबती स्टेडिअममध्ये भारत आणि इंग्लड यांच्यातील दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा इंग्लंडने जिंकून प्रथम फलंदाजीची निर्णय घेतला. या सामन्यात इंगलंडने प्रथम फलंदाजी करत टीम इंडियासमोर ३०५ धावांचे तागडे आव्हान ठेवले आहे. भारताने ४ विकेट राखून इंग्लडवर विजय मिळवला. या विजयासह भारताने इंग्लडविरुद्धची वनडे मालिकादेखील जिंकली आहे.
रोहित शर्माची बॅट तळपली
रोहितने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात करिअरमधील 32वे शतक झळकावले. रोहितने फक्त 76 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने षटकार मारून १०० धावा पूर्ण केल्या. रोहितच्या या शतकी खेळीत 7 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता. आज इंग्लंडविरुद्ध रोहितने पुन्हा एकदा हिटमॅन खेळी करून दाखवली.
रोहित शर्माने वनडे क्रिकेट कारकिर्दितलं दुसरं वेगवान शतक ठोकलं. यापूर्वी दिल्लीत 2023 साली अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यानंतर आता इंग्लंडविरुद्ध 76 चेंडूत शतक ठोकलं आहे.या सामन्यात शुभमन गिलने त्याला उत्तम साथ देत चांगली भागीदारी केली. गिलने ५२ चेंडूत ६० धावा केल्या. तसेच श्रेयसने ४७ चेंडूत ४४ धावा, अक्षर पटेलने ४१ धावा करून टीमच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
टीम इंडियाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर रविंद्र जडेजाची फिरकी चांगलीच चालली. त्याने बेन डकेट आणि जो रूट या दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या. रविंद्र जडेजाने 10 षटकात 35 धावा देत तीन गडी बाद केले. यात त्याने षटक निर्धाव टाकलं. तसेच वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शामी, आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
इंग्लंडने 49.5 षटकात 10 गडी गमवून 304 धावा केल्या आणि विजयासाठी 305 धावांचं आव्हान दिलं होते. दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडकडून बेन डकेट आणि जो रूट यांची बॅट तळपली. दोघांनी अर्धशतकी खेळी करून इंग्लंडला सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. बेन डकेटन 56 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. तर जो रूटने 72 चेंडूत 69 धावांची खेळी केली.
विराटचा फॉर्म चिंताजनक
आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला फॉम गवसल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी अगोदर टीम इंडियाला मोठा दिलासा मिळला आहे. मात्र दुसरीकडे विराट कोहलीला अद्याप फॉर्म गवसला नाही. विराटचा फॉर्म टीम इंडियासाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विराटला फॉर्म गवसतो का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद.





