Team India Squads Announced : अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा ! ‘या’ खेळाडूंना दिला संघातून डच्चू
अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात (Team India Squads Announced) अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

Team India Squads Announced : अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात (Team India Squads Announced) अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवची प्रथमच भारतीय संघात निवड झाली आहे.
एकमेव कसोटीसाठी के.एल. राहुलला उपकर्णधारपद देण्यात आले असून, ऋषभ पंतचे उपकर्णधारपद (Team India Squads Announced) काढून घेण्यात आले आहे. तसेच पंतला वनडे संघातूनही वगळण्यात आले आहे.
दमदार फॉर्मात असलेल्या इशान किशनचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या देवदत्त पड्डीकलचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. तर गुरनूर ब्रार, मानव सुतार आणि हर्ष दुबे यांना पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
बुमराहला विश्रांती, रोहित-कोहली-हार्दिकचा समावेश
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी (Team India Squads Announced) स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वनडे विश्वकरंडक स्पर्धेची तयारी या मालिकेपासून सुरू होत असल्याने माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ वनडे आणि टी२० क्रिकेट खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या मालिकेच्या संघातून रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज आकाश दीप यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी मानव सुतार, हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांना संधी देण्यात आली आहे.
दौऱ्याचे वेळापत्रक
अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात एक कसोटी आणि तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत.
– एकमेव कसोटी : ६ ते १० जून, मुल्लापूर (न्यू चंदीगढ). हा मुल्लापूरच्या मैदानावरचा पहिलाच कसोटी सामना असेल.
– वनडे सामने : धरमशाला, लखनौ आणि चेन्नई येथे होतील.
भारतीय खेळाडू सलग महिनाभर टी२० वर्ल्डकपच्या निमित्ताने व्यग्र होते. त्यानंतर लगेचच सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत २ महिने सातत्याने खेळत होते. भारतीय संघाचं यापुढचंही व्यग्र वेळापत्रक लक्षात घेता अफगाणिस्तानच्या या छोटेखानी दौऱ्यासाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात येईल अशी चिन्हं होती.
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी संघ
शुबमन गिल (कर्णधार), के.एल.राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पड्डीकल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, मानव सुतार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.
वनडे मालिकेसाठी संघ
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल.राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.






