Team India : आशिया कपपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! ‘या’ खेळाडूंनी पास केली फिटनेस टेस्ट

Team India Fitness Test Updates : आशिया कप 2025 च्या आधी भारतीय क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, शार्दुल ठाकुर आणि वॉशिंगटन सुंदर यांनी सेंटर ऑफ एक्सीलेंस येथे फिटनेस टेस्ट यशस्वीरीत्या पास केली आहे. विशेषतः शुबमन गिल याच्या फिटनेसबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते, कारण तो नुकताच आजारातून सावरला आहे.
4 सप्टेंबरला यूएईकडे रवाना होणार भारतीय संघ –
नुकतेच शुबमन गिलचे टी-20 संघात पुनरागमन झाले असून त्याच्यावर उपकर्णधाराचीजबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच जसप्रीत बुमराहचे पूर्णपणे तंदुरुस्त होणे ही भारतीय संघासाठी मोठी दिलासादायक बाब आहे. भारतीय संघ 4 सप्टेंबरला आशिया कपसाठी यूएईला रवाना होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
🚨 ALL THE PLAYERS HAS PASSED THE FITNESS TEST 🚨
– Rohit, Gill, Bumrah & everyone passed the fitness Test in CoE. [Rohit Juglan from RevSportz] pic.twitter.com/5Td8MzYK7T
— Johns. (@CricCrazyJohns) August 31, 2025
संघ निवड आणि खेळाडूंची भूमिका –
त्यानंतर 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात बहुप्रतिक्षित सामना रंगणार आहे. 19 सप्टेंबरला भारताचा सामना ओमानविरुद्ध होईल. आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच झाली आहे.निवड समितीने सलामीवीर म्हणून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांच्यावर विश्वास दाखवला आहे, तर संजू सॅमसनलाही संघात स्थान मिळाले आहे.
जितेश शर्माला बॅकअप यष्टीरक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. खराब फॉर्म असूनही रिंकू सिंगने संघातील आपले स्थान कायम राखले आहे. गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली असून, त्याला अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांची साथ मिळेल.आशिया कप 9 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, भारतीय संघ या स्पर्धेत विजयाचा दावेदार मानला जात आहे.
हेही वाचा – DPL 2025 : नितीश-दिग्वेशच्या भांडणात सहकारी खेळाडूंनी घेतली उडी, हर्षित-सॉल्ट आणि सैनीने राणाला दिला पाठिंबा
आशिया कप 2025 साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षीत राणा, रिंकू सिंग.





