IND vs BAN 2nd Test : भारतानं पहिला डाव 285 धावांवर केला घोषित, बांगलादेशविरुद्ध घेतली महत्वपूर्ण आघाडी…

India vs Bangladesh 2nd Test : बांगलादेश विरुद्ध कानपूर येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने 9 गडी गमावून 285 धावा करून पहिला डाव घोषित केला. यासह टीम इंडियाने पहिल्या डावानंतर बांगलादेशविरुद्ध 52 धावांची आघाडी मिळवली.
टीम इंडियासाठी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या डावात अर्धशतके झळकावली. यशस्वीने 51 चेंडूत 12 चौकार अन् 2 षटकारासह 72 धावांची तर राहुलने 43 चेंडूत 7 चौकार अन् 2 षटकारासह 68 धावा केल्या. विराट कोहलीने 47 आणि शुभमन गिलने 39 धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून मेहंदी हसन आणि शकिब अल हसन यांनी सर्वाधिक 4 बळी घेतले. तर हसन महमूदला 1 यश मिळाले.
Innings Break!#TeamIndia have declared after scoring 285/9 in just 34.4 overs and have a lead of 52 runs 👏👏
Bangladesh 2nd innings coming up.
Scorecard – https://t.co/JBVX2gz6EN#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/8tbuFb6GiT
— BCCI (@BCCI) September 30, 2024
कानपूर कसोटीत बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपल्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल टीम इंडियासाठी सलामीला आले. यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकात तीन चौकार मारले, मात्र यानंतर रोहितने येताच खळबळ उडवून दिली. भारतीय कर्णधाराने त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरही त्याने आणखी एक लांबलचक षटकार मारला. रोहित आणि जैस्वाल या जोडीने अवघ्या 18 चेंडूत 50 धावांचा टप्पा पार केला. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने केलेले हे सर्वात जलद अर्धशतक आहे. मात्र त्यानंतर रोहित शर्मा 11 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने 3 षटकार आणि 1 चौकार लगावला.
IND vs BAN 2nd Test : बुमराह-सिराज-आकाशदीपचा भेदक मारा, बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांत आटोपला..
केएल राहुलने ठोकले अर्धशतक….
यानंतर शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 36 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. यानंतर विराट कोहलीच्या आधी मैदानात आलेला ऋषभ पंत 9 धावा करून बाद झाला. यानंतर कोहली आणि केएल राहुलने डाव वेगाने पुढे नेला, पण नंतर 47 धावा करून कोहली बाद झाला. यानंतर जडेजा 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आकाश दीपने 12 धावांचे योगदान दिले. शेवटपर्यंत फलंदाजी करताना केएल राहुल 43 चेंडूत 68 धावा करून बाद झाला. यानंतर भारताने 9 बाद 285 धावा करून डाव घोषित केला.





