IND vs ENG : टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत विक्रमी सहाव्यांदा ट्रॉफीवर कोरलं नाव! वैभव-अम्ब्रीश ठरले विजयाचे शिल्पकार
IND vs ENG : हरारे स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी धुव्वा उडवत सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले.

IND vs ENG India win U19 World Cup 2026 final : भारतीय अंडर-१९ संघाने क्रिकेट विश्वावर आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी धुव्वा उडवत सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. वैभव सूर्यवंशीची १७५ धावांची वादळी खेळी आणि कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडचे आव्हान मोडीत काढले.
वैभवचा ‘रौद्र’ अवतार; भारताचा ४११ धावांचा डोंगर
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार आयुष म्हात्रेचा निर्णय सार्थ ठरला. सुरुवातीला सलामीवीर आरोन जॉर्ज (९) स्वस्तात बाद झाला, मात्र त्यानंतर मैदानावर ‘वैभव’ वादळ आले. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने अवघ्या ८० चेंडूंत १५ चौकार आणि १५ षटकारांच्या मदतीने १७५ धावा कुटल्या. त्याचे दुहेरी शतक अवघ्या २५ धावांनी हुकले, मात्र तोपर्यंत भारताने सामन्यावर पकड मिळवली होती.
वैभव सूर्यवंशीला कर्णधार आयुष म्हात्रेने ५३ धावांची संयमी खेळी करत दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी रचली. डावाच्या शेवटी अभिज्ञान कुंडू (४०) आणि कनिष्क चौहान (नाबाद ३७) यांनी फटकेबाजी करत भारताची धावसंख्या ९ बाद ४११ धावांपर्यंत पोहोचवली, जो फायनलमधील सर्वोच्च स्कोअर ठरला.
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦 🏆
Congratulations to India U19 on winning the ICC Men’s U19 World Cup 2026 👏👏
Their historic 6⃣th title 🫡
Take. A. Bow 🙇
Scorecard ▶️ https://t.co/hisult7mtv #U19WorldCup pic.twitter.com/5a0Pf4wpTw
— BCCI (@BCCI) February 6, 2026
भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी टाकली नांगी –
4⃣3⃣9⃣ Runs
6⃣2⃣.7⃣1⃣ Average
1⃣7⃣5⃣ Highest
3⃣ Fifties and 1⃣ HundredFor his staggering impact with the bat, Vaibhav Sooryavanshi is named the Player of the Tournament at the #U19WorldCup 2026 👌👌
Updates ▶️ https://t.co/hisult6ODX pic.twitter.com/hqMQZB0LrO
— BCCI (@BCCI) February 6, 2026
४१२ धावांचे महाकाय लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जोसेफ मुरेस (१७) लवकर बाद झाला. त्यानंतर बेन डॉकिन्स (६६) आणि बेन मेयस (४५) यांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स घेत इंग्लंडवर दबाव कायम ठेवला.
भारतीय गोलंदाजांचे दमदार प्रदर्शन
शेवटच्या षटकांमध्ये कॅलेब मॅथ्यू फाल्कनरने झुंजार खेळी करत इंग्लंडच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या, पण भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संपूर्ण संघ ४०.२ षटकांत ३११ धावांत गारद झाला. भारताकडून आर.एस. अम्ब्रीशने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना १०० धावांनी जिंकून विश्वचषकावर पुन्हा एकदा कब्जा केला.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : ‘सूर्य’वंशात जन्माला आलेल्या वैभवला कोणीच रोखू शकत नाही! युवा खेळाडूच्या वादळी खेळीवर सेहवाग फिदा
भारताचा विश्वविजेतेपदाचा प्रवास –
मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता जेतेपद पटकावले आहे. २०१२, २०१८, २०२२ नंतर आता २०२६ मध्येही भारताने आपले वर्चस्व कायम राखले असून सहावे जेतेपद पटकावणारा भारत हा जगातील एकमेव संघ ठरला आहे.





