Teachers’ Protest : सन्मान नको, पेन्शन द्या! शिक्षक दिनी शिक्षकांचे काळ्या फिती लावून अनोखे आंदोलन
एरवी ज्या दिवशी संपूर्ण देशात शिक्षकांचा (Teachers' Protest) गौरव होतो, त्याच शिक्षक दिनी बुलढाण्याच्या रस्त्यांवर मात्र एक वेगळेच विषण्ण आणि अस्वस्थ करणारे चित्र पाहायला मिळाले.

Teachers’ Protest : एरवी ज्या दिवशी संपूर्ण देशात शिक्षकांचा (Teachers’ Protest) गौरव होतो, त्याच शिक्षक दिनी बुलढाण्याच्या रस्त्यांवर मात्र एक वेगळेच विषण्ण आणि अस्वस्थ करणारे चित्र पाहायला मिळाले. हातात काळ्या फिती बांधून शेकडो शिक्षक अत्यंत शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने चालत होते.
ओठांवर मौन, पण डोळ्यांत संताप आणि चेहऱ्यावर हक्काच्या संघर्षाची चीड घेऊन निघालेल्या या मूक मोर्चाने संपूर्ण व्यवस्थेला हादरवून सोडले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा केवळ एक निदर्शनाचा (Teachers’ Protest) भाग नव्हता, तर गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या पाठीशी सुरू असलेल्या अन्यायाचा स्फोट होता.
शिक्षकांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी १ सप्टेंबरपासूनच हातावर काळ्या फिती बांधून या निषेध पर्वाला सुरुवात केली होती. या संतापाची मुळे शासनाच्या एका जाचक निर्णयात दडलेली आहेत. २००५ पूर्वी ज्या शिक्षकांची नियुक्ती झाली, त्यांच्या शाळा कालांतराने १०० टक्के अनुदानावर आल्या.
नियमानुसार हे शिक्षक जुन्या पेन्शनसाठी पात्र ठरायला हवे होते; मात्र शासनाने २०१० मध्ये अचानक एक शासन निर्णय (GR) लागू केला आणि या नियमाच्या आडून हजारो शिक्षकांना जुन्या पेन्शनच्या संरक्षणातून बाहेर फेकले. यामुळे आज सेवानिवृत्त झालेल्या अनेक ज्येष्ठ शिक्षकांना उतारवयात जगण्यासाठी भीषण आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
राज्यात तब्बल २६ हजार शिक्षक या प्रलंबित पेन्शनच्या जाचात होरपळत आहेत. आयुष्यभर ज्ञानाचे दान देणारे शिक्षक आज आपल्या वृद्धापकाळाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरायला भाग पडले आहेत. शासनाने (Teachers’ Protest) यावर तातडीने तोडगा न काढल्यास हा संघर्ष आता केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता थेट मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलनाच्या रूपात धडकेल, असा स्पष्ट इशारा मोर्चातील आंदोलकांनी दिला.






